आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद आरक्षण:जानेफळ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेक इच्छुक

गणेश सवडतकर | जानेफळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात जानेफळ मधील मतदार व उमेदवारामध्ये आरक्षण कोणते निघते, याची उत्सुकता लागली होती. अखेर जानेफळ जिल्हा परिषद आरक्षण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गाला सुटल्याने अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर आगामी प्रभाग रचनेमध्ये आणखी बदल झाला तर पुन्हा एकदा आरक्षण बदलू शकते. परंतु सध्या तरी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण आल्याने देवानंद पवार यांच्या उमेदवाराचा मार्ग मात्र सुखकर झाल्याचे दिसत आहे.

सध्या तरी देवानंद पवार यांच्या तुलनेत कोणताही तुल्यबळ उमेदवार समोर आला नाही. पवार यांनी अनेक खेड्यापाड्यात विकास कामे केली आहेत. त्यामुळे मतदारांचा त्यांच्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सागर पाटीलही उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असून त्यांनीही या परिसरात मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीने या सर्कलमध्ये रंगत येणार आहे.

वेळप्रसंगी राष्ट्रवादीचे गजानन तात्या कुपाळ ही या सर्कल मध्ये उभे राहण्याची शक्यता आहे. तर सेनेत सध्या गटातटाचे राजकारण सुरू असल्याने सेनेचा कोणताही उमेदवार पुढे येण्यास तयार नाही. तर भाजपा ही अजून तरी उमेदवारांच्या बाबतीत स्पष्टपणे कुठेही बोलताना दिसत नाही. त्यामुळे एकंदरीत सध्या तरी देवानंद पवार काँग्रेसकडून एकमेव उमेदवार आहेत. तर मागील पंचवार्षिक च्या निवडणुकीत शिवसेनेचे मोहन धोटे यांच्या पत्नी या मोठ्या फरकाने देवानंद पवार यांच्या सून मनीषा पवार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.

तेव्हापासून मोहन धोटे कुठेच राजकीय दृष्ट्या सक्रिय दिसले नाहीत. व्यवसायात त्यांनी भरारी घेतली असली तरी राजकीय दृष्ट्या ते कुठेच प्रबळ दिसले नाहीत. परंतु आता जसा प्रवर्ग सर्व साधारण महिलांसाठी खुला झाला तसा एकदा पुन्हा बॅनर बाजीच्या माध्यमातून मोहन धोटे यांनी आपण पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचा संदेश दिला आहे. एकंदरीत मोहन धोटे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो इतका प्रबळ नाही. फक्त शिवसेनेच्या वरिष्ठांनी सांगितले तरच उभे राहायचे, स्वतःची पाहिजे तशी ताकत या मतदार संघात त्यांची नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

सध्या तरी देवानंद पवार या मतदारसंघांमध्ये आपली मुलगी माधुरी पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांच्यापैकी एकाला उमेदवारी घेऊन पूर्ण ताकतीने लढण्यास तयार असल्याचे दिसत आहे. भविष्यात आरक्षणात काही बदल झाला तर या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आणखी काही वेगळे चित्र असु शकते का, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.

बातम्या आणखी आहेत...