आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिर:शीतकरण व्यवस्था नसल्याने अनेक कर्मचारी रक्तदानापासून वंचित

जळगाव जामोद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महसूल व वन विभागाने संयुक्तरीत्या महाराजस्व अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला आहे. या रक्तदान शिबिरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे.

येथील पालिकेच्या सांस्कृतीक भवनात ४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार शीतल सोलाट यांनी प्रथम रक्तदान केले. त्यानंतर नायब तहसीलदार मार्कंड, एस. व्ही. गायकवाड, बी.एस. किटे व त्यांची पत्नी, ठाणेदार सुनील आंबुलकर व त्यांची अर्धांगीनी, वैद्यकीय अधिकारी भगत यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी अशा एकुण १०२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

परंतु वेळे अभावी व रक्त शीतकरण व्यवस्था नसल्यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत रत्नपारखी, वैद्यकीय अधिकारी राजश्री पाटील, अधिपरिचारिका कमल शिंदे, कक्ष सेवक अशोक पराते व वाहन चालक रमेश अवचार यांनी रक्त संकलित केले. तर त्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी अापला सहभाग नोंदवला होता. शिबिराच्या यशस्वितेसाठी महसूल व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...