आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची मागणी:उपविभागीय अधिकारी कार्यालयाला लागलेल्या आगीत अनेकांचे हात ‘काळे’; महसूलच्या दप्तरात दडलंय तरी काय,माजी मंत्री सावजींनी केली चौकशीची मागणी

डोणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अधिकारी येतील त्यांचा कार्यकाल होईपर्यंत काम करतील आणि कार्यकाळ संपताच बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन त्या ठिकाणचा कारभार पाहतील. परंतु स्थानिक नागरिकांचे रेकॉर्ड आहे त्याच ठिकाणी कायमचे राहणार आहे. दरम्यान, मेहकर उपविभागीय कार्यालयाला लागलेली आग मात्र लावली की लागली हा सध्या परिसरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या आगीमुळे अनेकांचे हात मात्र काळे झाले असल्याचे बोलल्या जात आहे.

मेहकर उपविभागीय कार्यालयांतर्गत मेहकर तालुक्यासह लोणार तालुक्यातील गावांचा कारभार पाहिला जातो. दोन्ही तालुके मिळून जवळपास २५० गाव यामध्ये समाविष्ट असून पंधरा महसूल मंडळ देखील यामध्ये समाविष्ट आहेत. शेतीची प्रकरणे, विहिरीची नोंद, शालेय रेकॉर्ड, संबंधित आवश्यक असलेला जातीचा दाखला, लेआऊट संदर्भात असलेली नगररचना विभागाने दिलेली कागदपत्रांची पूर्तता करणे मेहकर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या निवडणूक प्रक्रिया दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आदी बाबींचे दस्तऐवज तयार करणे व ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाचे असते.

मेहकर शहरामध्ये गत वर्षभरापासून अवैध ले आऊट धारकांनी मोठे बस्तान मांडून ठेवले आहे. यामध्ये हजारो नागरिकांनी तोडकी मोडकी रक्कम देऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर नोटरी देखील केली आहे. परंतु एन ये ३४ करून देण्याची अट खरेदी खताच्या वेळी करून देऊ अशी अट असताना बनावट कागदपत्रांचा आधार असल्यामुळे सदर खरेदीखत होत नाही.

याबाबतच्या अनेकांनी तक्रारी देखील वरिष्ठांकडे केल्या आहेत. अवैध लेआऊट धारकांची होत असलेली अरेरावीमुळे अनेकांनी उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे माहिती अधिकार देखील टाकले होते. माहिती अधिकार मिळण्‍यापूर्वीच अर्जदार यांचा माहिती अधिकाराचा अर्जासह बनावट व अवैधरीत्या पाडलेले लेआऊट चे कागदपत्र देखील आगीमध्ये भस्मसात झाल्याचे पंचनाम्यात नमूद केल्यामुळे मेहकर शहर व परिसरामध्ये उपविभागीय महसूल कार्यालयाला आग लागली की लावली अशी चर्चा जोर धरत असून यात अनेकांनी आपले हात मात्र काळे केले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...