आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रामीण भागातील पोलिस स्टेशन म्हणून ख्याती असलेल्या साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने येथे येण्यास अनेक इच्छुक आहेत. दरम्यान, ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या बदली बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कुठलाच विचार केला नसल्याचे समजते.
साखरखेर्डा पोलिस ठाण्यात स्व.सचिन शिंदे सामाजिक सभागृहाची प्रशस्त इमारत उभी करणे, जातीय सलोखा अबाधित ठेवून शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन वाद मिटवणे, चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वखर्चाने सुरक्षारक्षक नेमणूक करणे, कोरोनाच्या टाळेबंदीत महत्त्वाची भूमिका बजावणे आदी कार्य जितेंद्र आडोळे यांनी केले आहे. आता त्यांची बदलीची शक्यता असल्याने सदर पोलिस ठाणे मिळवण्यासाठी परिसरातील काही ठाणेदार कंबर कसून कामाला लागले आहेत.
तर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आडोळे यांनी बदलीचा निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आडोळे हे अजून एक वर्ष येथेच राहणार असल्याची शक्यता बळावत आहे. तशातच आडोळे यांना कार्यकाळ वाढून मिळावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
साखरखेर्डा सारख्या संवेदनशील गावात माझी कारकीर्द चांगली राहिली. लोकांनी दिलेले प्रेम आणि पोलिसांना केलेल्या सहकार्यानेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मला बळ मिळाले. मी शिपाई समजून आजवर जनतेची सेवा केली आहे. वरिष्ठांच्या विश्वासार्हतेला कदापिही तडा जाऊ दिला नाही, ठाणेदार जितेंद्र आडोळे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.