आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे पूर्वापार चालत असलेल्या अनेक परंपरा काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत. परंतु मेहंदीची परंपरा आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. एवढेच नव्हे तर मेहंदी लावणाऱ्यांची संख्या कमी झाली नसून उलट वाढली आहे. अनेक तरूणींमध्ये मेहंदी लावण्याची क्रेझ वाढली आहे.
कुठल्याही शुभ कार्यात किंवा सणांमध्ये मेहंदी लावणे ही आपली परंपरा दर्शवते. ती धार्मिक सणांच्या दिवशी लावणे देखील शुभ मानली जाते. चित्रपट आणि दूरदर्शनवरील मालिकांचा प्रभाव असलेल्या समाजात मेहंदी ही क्रेझ बनली आहे. जी पूर्वी फक्त एक विधी होती. नातेवाइक आणि महिलांना एकत्र करुन मेहंदी लावणे आणि नृत्य गाणे ही एक सामान्य प्रथा बनली आहे. लग्न समारंभात भर घालण्यासाठी स्टायलिश मेहंदीच्या डिझाईनची मागणी वाढली आहे. महिलांना एकापेक्षा एक स्टायलिश डिझायनर आकर्षक मेहंदी हाताला लावणे आवडते. एवढेच नव्हे तर या मेहंदी स्टाइलमध्ये पारंपारीक वेलबुट्टी स्टायलिश पद्धतीने लावली जात आहे. मोराची पिसे, कलश, फुले मानवी आकृती इत्यादी ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये नवीन डिझाईनची केलेली मेहंदी दिसू लागली आहे. एकीकडे लग्न समारंभात मेहंदी लावणे शुभ मानले जाते.
विशेष म्हणजे या मेहंदीमुळे हाताचे सौंदर्यही वाढते. आजकाल मेहंदी लावण्यासाठी एक्सपर्टला बोलावण्याचे चलनही वाढले आहे. वधूच्या हातावर मेहंदी काढण्याचे दर अधिक आहेत. मेहंदी काढणारे सर्वत्र उपलब्ध आहेत. ती लावण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. आता विविध प्रकारचे कोन वापरले जात आहेत. महिलाच नव्हे तर अविवाहित तरूणीदेखील मेहंदी लावण्यासाठी उत्सुक असतात. लग्नाच्या आदल्या रात्री किंवा हळदीच्या आधीच मेहंदी लावली जात आहे.
अनेकांना मिळाला रोजगार; महिलांसोबतच पुरुषांचाही सहभाग
लग्नसमारंभातच नव्हे तर अलिकडे प्रत्येक घरगुती व लहान मोठ्या कार्यक्रमांत महिला, युवती हातावर मेहंदी लावणे पसंत करतात. मेहंदीची वाढती क्रेझ लक्षात घेता आता याला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक महिला, युवती आपल्या घरातूनच हा व्यवसाय सुरू करीत आहेत. लग्नासाठी किंवा अन्य कार्यक्रमांसाठी ऑर्डर मिळताच त्या घरपोच जाऊन सेवा देत आहेत. या व्यवसायात केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही सहभागी झाले आहेत. अलिकडे वर्षभर काम मिळत असल्याने या व्यवसायाला स्थायी रुप आले आहे.
-
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.