आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुडहुडी किंचित कमी:सर्दी-पडसे, खोकला यासारख्या किरकोळ आजारांची अनेकांना लागण

बुलडाणा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली. तथापि, मागील दोन-तीन दिवसांत थंडी किंचित कमी झाली आहे. गुरूवारी, दि. २४ नोव्हेंबर रोजी शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर १४ अंश सेिल्सअस अशी किमान तापमानाची नोंद झाली. यावर्षी पावसाळा चांगलाच लांबला. दिवाळी उंबरठ्यावर आली असतानाही जिल्ह्यात अध्ून-मध्ून पाऊस सुरूच होता.

पावसाने निरोप घेतल्यानंतर दिवाळी संपताच सातत्याने तापमान घसरण्यास सुरुवात झाली. तापमान घसरणीच्या या मालिकेमुळे काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगलीच थंडी जाणवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

गरम पेय पिण्यावर भर
वाढत्या थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी अनेकजण चहा, कॉफी यासारखे गरम पेय पिण्यावर भर देत आहेत. चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवर विशेषत: सकाळी, सायंकाळी गर्दी वाढल्याचे दिसत आहे. उष्मांक वाढवणाऱ्या आहारावरही भर दिला जात आहे.

हेल्थ इज वेल्थ’ला प्राधान्य
आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा पोषक ऋतू असल्याने सकाळच्या वेळी थंडीतही फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेकजण दररोज शहराबाहेरील रस्त्यांवर रनिंग, मॉर्निंग वॉक तसेच व्यायामासाठी जात आहेत. त्यामुळे ‘हेल्थ इज वेल्थ’ या मंत्राला अनेकांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...