आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहात रवानगी:अल्पवयीन मुलीचे लग्न; आठ जणांविरुद्ध गुन्हे ; आरोपींमध्ये आई-वडील, भावाचा समावेश

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आई, वडील, भाऊ यांच्यासह इतर आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यातील देवधाबा येथील मातापित्याने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मध्यस्थामार्फत काही दिवसांपूर्वी नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील महेश मधुकर कळसकार या २९ वर्षीय युवकासोबत विवाह लावून दिला होता. अल्पवयीन मुलीला सासरी पाठवल्यानंतर तिच्या पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे तिने महिन्याभरापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाला घेऊन साक्षी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी आली असता आधार कार्डावरील जन्म तारखेच्या नोंदीवरून ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती बुलडाणा येथील बाल संरक्षण अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ मलकापूर गाठत अल्पवयीन साक्षी व तिच्या एका महिन्याच्या बाळाला घेऊन तिची बालसुधारगृहात रवानगी केली.

याबाबतची तक्रार ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव तायडे यांनी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा पती महेश मधुकर कळसकार, दीर विठ्ठल मधुकर कळसकार, सासरा मधुकर निनाजी कळसकार, मध्यस्थ रमेश लक्ष्मण धामोडे सर्व रा. वडनेर भोलजी, नणंद नंदाबाई अनिल भोजने रा. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, अल्पवयीन मुलीचे वडील नारायण तोताराम कऱ्हाडे, आई सरला नारायण कऱ्हाडे, भाऊ गजानन नारायण कऱ्हाडे सर्व रा. देवधाबा या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नवरोबास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार मिर्झा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...