आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या दुचाकीवरून पडल्याने एका पस्तीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खामगाव-अकोला रोडवरील कोलोरी फाट्याजवळ घडली. शीतल आबाराव देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे.

अकोला चवरे प्लॉट येथील रहिवासी शीतल आबाराव देशमुख ही महिला पतीसोबत एमएच ३० बीए ८८१३ या क्रमांकाच्या स्कूटीने अकोला येथून खामगावकडे येत होती. कोलोरी फाट्याजवळ गाडीवरून पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...