आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील शहीद पी.आय जनार्धन इंगोले यांच्यावर आज ६ जून रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीम संस्कारासाठी जनसागर उसळला होता. यावेळी भारत माता की जय यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रति पंढपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक एक पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले पीआय जनार्धन उत्तमराव इंगोले यांचा ५ जून रोजी मृत्यू झाला. सर्वप्रथम पुणे येथे राज्य राखीव दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज ६ जून रोजी सकाळी पाच वाजता मूळ गावी देऊळगाव माळी येथे आणण्यात आले. यावेळी गावात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे, जय जवान जय किसान या घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते. त्यानंतर शासकीय इतमामात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी बुलडाणा पोलिस दलातील जवानांनी त्यांना सलामी दिली. त्याचबरोबर मेहकरचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोहेकॉ सुरेश काळे, नायब पोलिस कर्मचारी रामेश्वर रिंढे, उमेश घुगे, अशोक घोंगे, अनिल काकडे, गजानन गारोळे, पोलिस पाटील गजानन चाळगे, सरपंच किशोर गाभणे, कैलास राऊत, शिवशंकर मगर, राजेश मगर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.