आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशाल यात्रा‎:मलकापुरात शिवसेनेची मशाल यात्रा‎

मलकापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या‎ विचारांचा प्रसार करण्यासाठी‎ तालुका व शहर शिवसेना‎ कार्यकारिणीच्या वतीने शनिवारी‎ संध्याकाळी मशाल यात्रेचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ ही मशाल यात्रा शहरातील‎ बसस्थानकापासून हनुमान चौक ते‎ तहसील चौक ते गाडगेबाबा पुतळा‎ मार्गे काढण्यात आली. यावेळी‎ जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी‎ मार्गदर्शन केले.

तालुका प्रमुख‎ दीपक चांभारे पाटील यांनी आभार‎ मानून मशाल यात्रेची सांगता‎ केली.मशाल यात्रेचे स्वागत‎ करण्यासाठी शहराध्यक्ष तथा‎ नगरसेवक राजू पाटील, सुहास‎ चवरे, अनिल गांधी यांनी‎ महाविकास आघाडीतर्फे हजेरी‎ लावली. मशाल पेटवण्याचा मान‎ नगरसेवक सुहास चवरे यांना देण्यात‎ आला. यावेळी जिल्हा प्रमुख‎ वसंतराव भोजने, दीपक चांभारे‎ पाटील, गजानन ठोसर, एकनाथ‎ डवले, विधानसभा संघटक‎ राजूसिंग राजपूत, विद्यार्थी सेनेचे‎ जिल्हा उपप्रमुख मंगेश सोनोने,‎ तालुका संघटक अक्षय रायपुरे,‎ गणेश सुशिर, पवन गरुड, आकाश‎ बोरले, शे. यासीन, मुस्ताक खान‎ पठाण, शिवसैनिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...