आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:जिममधून 26 हजाराचे‎ साहित्य चोरीस‎

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका‎ जिममधून सुमारे २६ हजार रुपयांचे‎ साहित्य चोरी गेल्याची घटना‎ उघडकीस आली आहे. या‎ प्रकरणी पोलिसांनी किशोर‎ बेंडवाल यांच्या तक्रारीवरून २‎ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला‎ आहे. या प्रकरणात एकास अटक‎ ही केली आहे. शहरातील मिलिंद‎ नगर भागात किशोर परसराम‎ बेंडवाल यांनी २००७ मध्ये युवा‎ जागृती नावाने जिम सुरु केली‎ आहे.

१ जानेवारी रोजी सकाळी ते‎ जिममध्ये सफाई करत असतांना‎ जिममधील सामान कमी दिसत‎ असल्याने त्यांच्या निदर्शनास‎ आले. त्यामुळे त्यांनी जिममधील‎ मुलांना त्याची माहिती देऊन लक्ष‎ ठेवण्याचे सांगितले. त्यातच २‎ जानेवारी रोजी सायंकाळचे‎ सुमारास किशोर बेंडवाल हे‎ बुलडाणा कारागृहाच्या पाठीमागे‎ फिरण्यासाठी गेले असता तेथे‎ त्यांना मिलिंद नगरमधील‎ आशुतोष उर्फ बंड्या संजय‎ पडघान हा दोन डंबेल घेऊन‎ जातांना दिसला.‎

बातम्या आणखी आहेत...