आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांच्या मनातील गणिताबाबत असलेली भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीसाठी तालुक्यातील वझर येथील जिल्हा परिषद शाळेत २ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय गणिताचा बाजार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्याना छोट्या-मोठ्या उद्योगाच्या गोडीबरोबरच गणित विषयाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच भविष्यात कोणत्याही लहान-मोठ्या व्यवसायाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, या हेतूने हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला.
तालुक्यांतील जिल्हा परिषद वझर शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. डी. खरात यांच्या प्रेरणेने व विषयतज्ज्ञ विनोद भुसांडे यांच्या संकल्पनेतून गणिताचा बाजार भरवण्यात आला. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी खरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन गायकवाड, प्रशासन अधिकारी आनंद देवकते शिक्षण विस्तार अधिकारी उर्मिला ठाकरे,केंद्रप्रमुख राजेंद्र गवारगुर, शाळा व्यवस्थापन समिती समिती अध्यक्ष रामदास लाहुडकार, सदस्य बाळू वाकोडे उपस्थित होते. यावेळी दुकानांमध्ये भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. यामुळे मुलांना स्वत: पैशाचे व्यवहार करता आले.
जि. प. शाळेत होते १६ स्टॉल
वझर शाळेच्या प्रांगणात गणित बाजारातील स्टॉलमध्ये किराणा दुकान, मैत्री नकाशाशी, दूध डेअरी, मामाच्या घरी जायचे कधी, अपूर्णांक झाले माझे सोपे, फळ विक्री केंद्र, घड्याळ बाबा, भाजीपाला विक्री केंद्र, कसोटया, एक थाळी उपयोग बारा, हसत खेळत पाढे निर्मिती, कापड दूकान, संख्या तुमची बेरीज वजाबाकी आमची, सूर्यमाला, दिशा व उपदिशा याप्रमाणे १६ स्टॉल होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.