आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहकर:राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये मयूर तिरके यास ब्राँझपदक

मेहकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती यांनी आयोजित केलेल्या एक दिवशीय राष्ट्रीय खुल्या योगासन स्पर्धेमध्ये मयुर तिरके याने तिसरा क्रमांक पटकावला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या योग विभागाने एक दिवशीय राष्ट्रीय खुली योगासन स्पर्धा १५ जून रोजी आयोजित केली होती. यामध्ये १० ते १४ या वयोगटामध्ये येथील योगशिक्षक प्रशांत सुरनर यांच्या मार्गदर्शनाखाली मयुर मधुकर तिरके याने तिसरा क्रमांक मिळविला.

२१ जुन योग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभामध्ये आंतरराष्ट्रीय योगगुरू आ.श्री. खोडस्कर व मंडळाच्या सचिव प्रा.डॉ.माधुरी चेंडके यांच्या हस्ते मयुरला ब्राँझपदक व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. या यशामुळे मयुरचे व त्याचे गुरु योगशिक्षक सुरनर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.