आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:यांत्रिक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मेहकर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने येथील आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्याचा त्यांच्या मूळगाव मृत्यू झाल्याची घटना आज ५ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. शुभम वानखेेडे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील रहिवासी शुभम वानखेडे हे येथील आगारात यांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

आज सकाळी राहत्या घरी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला मृत शुभम वानखेडे हे अविवाहित होते. या घटनेची माहिती मिळताच आगारातील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त करत आगारात श्रद्धांजली सभा घेतली. यावेळी आगार व्यवस्थापक रणवीर कोळपे, कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, सहायक वाहतूक अधीक्षक हरिश नागरे, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...