आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मेहकर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर ; तीन प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित

मेहकर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेची आरक्षण सोडत सोमवारी सिंदखेड राजाचे तथा मेहकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार संजय गरकल, मुख्याधिकारी आकाश सुरडकर उपस्थित होते. नगर परिषद शाळेच्या हॉलमध्ये आरक्षणाची सोडत दोन लहान चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्या काढून काढण्यात आले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक, तीन व प्रभाग क्रमांक नऊ हे तीन प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर प्रभाग दहा व तेरा मध्ये पुरुष अनुसूचित जातीसाठी निघाले आहेत. तेरा पुरुष आणि तेरा महिला असे २६ उमेदवार राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...