आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम:महिला, पुरुष सलग नऊ दिवस देतात पहारा

प्रवीण गायकवाड | मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपविभागाअंतर्गत येणाऱ्या लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जगदंबा देवीची नवरात्र उत्सवानिमित्त जागरणाची शंभर वर्षाची परंपरा आजही कायम ठेवत तब्बल चाळीस महिला व पुरुष रात्रंदिवस देवीचा जागर करीत आहेत. नवसाला पावणारी अशी अंजनी खुर्द येथील जगदंबा देवीची ओळख आहे.

औरंगाबाद- नागपूर या राज्य महामार्गावर असलेल्या अंजनी खुर्द गावात जगदंबा देवीचे मंदिर आहे. हे मंदिर महामार्ग लगत असल्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची रीघ लागलेली असते. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी जगदंबा देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली होती. जगदंबा देवी मंदिराची शंभर वर्षांपासूनची परंपरा आजही कायम ठेवण्याचे काम भाविक करीत आहेत. शंभर वर्षापासून या गावातील महिला व पुरुष देवीचा जागर करण्यासाठी देवीच्या मंदिराभोवती नऊ दिवस रात्र जागरणाचा पहारा देतात.

जो पुरुष किंवा महिला या जागरणासाठी नऊ दिवस बसणार असेल, त्यांना गावात जाण्यास बंदी असते. त्यामुळे ते रात्रंदिवस मंदिराच्या परिसरातच वावरत असतात. यावर्षी देखील चाळीस महिला व पुरुष या ठिकाणी जागरणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपासाच्या फराळाची व्यवस्था संस्थांतर्फे व भाविकांच्या वतीने करण्यात येते. जगदंबा देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी सध्या भाविक भक्तांची गर्दी वाढत आहे. दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रमाची रेलचेल असते. गावातीलच सदाशिव खोटे हे या ठिकाणी पारायणाचे वाचन करत आहेत. तर त्याचा लाभ जागरण करणारे महिला व पुरुष घेत आहेत. त्यामध्ये विठ्ठल खोटे, गजानन ठेंग, शेषराव तनपुरे, भगवान विठ्ठल गायकवाड, मनोहर भोकरे, प्रकाश तनपुरे, सदाशिव खोटे, गणेश मानवतकर, एकनाथ मुळे, गजानन मोहिते, बालाजी गायकवाड, मदन गिरी, हरिहर महाराज, मधुकर तनपुरे, शिवाजी तनपुरे यांचा समावेश आहे.

यंदा ४० जण करताहेत जागर
मागील शंभर वर्षापासुन अंजनी खुर्द येथील जगदंबा मातेच्या मंदिरात जागर करण्याची परंपरा असून ती आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जात आहे. दरम्यान यंदा गावातील चाळीस महिला व पुरुष भाविक जागर करण्यासाठी बसले आहेत. या सर्व भाविकांच्या फराळाची व्यवस्था मंदिर संस्थानकडून करण्यात येत आहे. नवरात्रीच्या दिवसात हे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले असते.

बातम्या आणखी आहेत...