आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्या विकास विद्यालय कोलवड येथे क्षितिज फाउंडेशन आणि बुलडाणा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून मासिक पाळी स्वच्छता जनजागृती पदयात्रेला शाळेतील विद्यार्थ्यांनी, शाळेतील कर्मचारी वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आणि गावकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. २मे रोजी ही पदयात्रा काढण्यात आली.
मासिक पाळीच्या संदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर व मन स्वास्थ्य वर नकारात्मक परिणाम होत असतात. महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जर चांगले राहिले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. पण समाजात रुजलेल्या चुकीच्या धोरणामुळे मासिक पाळीला एक आजार समजला जातो. किंवा मासिक पाळी मध्ये स्त्रीचा विटाळ केला जातो. त्यामुळे स्त्रियांची मानसिक स्थिती खालावते. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा अभाव. मासिक पाळी हा आजार नसून विटाळ असून नवनिर्माणाची प्रक्रिया आहे. मासिक पाळी जर आली नाही तर नवनिर्माण होऊ शकणार नाही. मुलं जन्माला येणार नाहीत.
त्यामुळे स्त्रियांचा मासिक पाळी दरम्यान विटाळ करू नका. स्त्रीत्वाचा सन्मान करा आणि स्त्रियांनी मासिक पाळीची लाज बाळगू नका हे समाज मनावर बिंबवण्यात करिता क्षितिज फाउंडेशन आणि बुलडाणा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून कोलवड गावात जनजागृतीपर पदयात्रा काढली. या पदयात्रेत मध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या घोषणा देऊन गावामध्ये जनजागृती केली. मासिक पाळी म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान, मातृत्वाचा अभिमान. आली माझी ग पाळी, मीच देते तुला टाळी. अशा घोषणांनी कोलवड गाव दुमदुमून गेला. मासिक पाळी स्वच्छता जनजागृती पदयात्रा यशस्वी करण्याकरिता विद्या विकास विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सहकार्य केले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी विद्या विकास विद्यालयाचे प्राचार्य सुनील जवंजाळ यांनी मेहनत घेतली.
क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल चौधरी कदम यांनी यापूर्वीच शाळेमध्ये मासिक पाळी जनजागृती संदर्भात विद्यार्थिनींची सुसंवाद साधला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नि संकोच न करता पदयात्रेत सहभाग नोंदवून मनमोकळेपणाने जनजागृतीचे कार्य पार पाडले. बुलडाणा फिल्म सोसायटीचे सल्लागार प्रेम इंगळे यांनी विद्यार्थिनिसोबत सुसंवाद साधून त्यांना बोलते केले. जनजागृतीपर पदयात्रा यशस्वितेकरिता दंतचिकित्सक डॉक्टर गायत्री सावजी , समाजसेविका अनिता कापरे, पोलिस कॉन्स्टेबल कोकीला तोमर बुलडाणा फिल्म सोसायटीचे सचिव सूरज वाडेकर यांनी परिश्रम घेतले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.