आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी:जीएसटी रद्द करण्यासाठी एमआयएमचे आंदोलन; शैक्षणिक साहित्यावरील जी एसटी

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न धान्य, दुग्धजन्य पदार्थ व शैक्षणिक साहित्यावरील जी एसटी रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन एमआयएमच्या वतीने आज २६ जुलै रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष दानीश शेख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केंद्र सरकारने नुकतेच अन्न धान्य दुग्धजन्य पदार्थ व शैक्षणिक साहित्यावर जी एसटी आकारली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. या वर्षीपासून थोडी आर्थीक परिस्थिती सुधारत असतांना नव्यानेच केंद्र सरकारने जनतेच्या जीवनावश्यक वस्तूंवर जी एसटी आकारली आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला हलाखीचे जीवन जगण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या प्रकरणाकडे गांर्भीयापुर्वक लक्ष देवून जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जी एसटी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात, कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, अ‍ॅड. इमरान रशीद खान, मो. दानीश अजहर, सलीम, हफीज सत्तार, समीर आयान, आसिफ खान, आसिफ कुरैशी, अ.मलीक, शे. मुख्तार, अब्दुल रफीक अरब यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...