आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:आमदार महाले यांना केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट आमदार २०२२’ पुरस्कार

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कारांपैकी ‘सर्वोत्कृष्ट आमदार - २०२२’ हा पुरस्कार आमदार श्वेता महाले यांना केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते १६ मार्च रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांनी चिखलीच्या जनतेच्या वतीने सन्मानाचा स्वीकार केला. सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड्स अँड लीडरशिप समीट २०२२ चे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रदीप भारद्वाज यांनी पत्रात म्हटले होते की,”समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

‘हा सन्मान माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा सन्मान
जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडी अडचणीत सुख दुःखात सहभागी होता आले आणि येत आहे हे माझे भाग्य आहे. त्यामुळे हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते अशी प्रतिक्रिया आमदार श्वेता महाले यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...