आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे-शिंदे गटात राडा:बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; आ. गायकवाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

बुलढाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद शनिवारी बुलढाण्यात पाहायला मिळाले. या ठिकाणी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात शिंदे गटाने जोरदार राडा घातला.

बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

नेमकी घटना काय?

ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि उपनेते लक्ष्मण वडले यांना मारहाण केली, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर​​​​ म्हणाले की, हल्ला करणाऱ्यामंध्ये सर्वात पुढे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते असा आरोप खेडकरांनी केला आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका?

जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलिस बघ्याची भूमिका घेऊन होते, असाही आरोप खेडकर यांनी केला आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडल्याने बुलढाणा शहरात अफवांना पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रत्यक्ष बुलढाणा बाजार समितीमधील सभागृहात भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...