आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चून-चून के मारे जाएंगे:बुलडाण्यातील राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांची शिवसेनेला थेट धमकी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाण्यात शनिवारी शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाला होता. शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात आमच्या नेत्यांवर टीका का करता? असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने राडा केल्याची केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर आता पुन्हा आमदार गायकवाड यांनी धमकी दिली आहे.

"चून-चून के गिण-गीण के मारे जायेगे" अशी थेट धमकी बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेला दिली आहे. "इतकेच नव्हे तर, पोलिस होते म्हणून कालच्या राड्यात कमी झाले, मात्र पुढच्या वेळी आणखी जास्त राडा होईल" असा इशाराही गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आणखीणच चिघण्याची शक्यता आहे.

काल झाला होता राडा

काल शिवसेनेकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम चालू असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, असे म्हणत या कार्यक्रमात राडा करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. खुर्च्यांची तोडफोड करत हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. राड्यादरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले. खुर्च्यांची तोडफोड करत कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा प्रकार झाला.

नेमकी घटना काय?

ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि उपनेते लक्ष्मण वडले यांना मारहाण केली, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर​​​​ म्हणाले की, हल्ला करणाऱ्यामंध्ये सर्वात पुढे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते असा आरोप खेडकरांनी केला आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका?

जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलिस बघ्याची भूमिका घेऊन होते, असाही आरोप खेडकर यांनी केला आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडल्याने बुलढाणा शहरात अफवांना पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रत्यक्ष बुलढाणा बाजार समितीमधील सभागृहात भेट देऊन पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...