आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉट रिचेबल:शिवसेनेच्या शिंदे गटासोबतच्या शिष्टाईसाठी आमदार संजय कुटे सुरतमध्ये; सेनेच्या भाऊंना समजावण्याचे प्रयत्न

बुलडाणा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदार भाऊही नॉट रिचेबल लागत आहेत. त्यांचे सुमधूर संबध असलेले खा. प्रतापराव जाधव दोन्ही भाऊंना आपलेसे करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. शिंदे गटासोबत शिष्टाई करण्यासाठी भाजपने प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांना जबाबदारी सोपवल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याशीही मोबाइलवरून संपर्क होत नाहीये.

एकनाथ शिंदे व पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. डॉ. संजय रायमूलकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळेच महिनाभराआधी आ. संजय रायमूलकर यांनी मोबाइलच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवला होता. या घटनेनंतर डीपी व्हायरल झाला आहे. आ. संजय गायकवाड हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे असे पक्ष प्रवास करुन आल्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांच्यासोबत शिवसेनेत आले व यावेळी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. निवडून आल्यानंतर त्यांचीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत चांगलीच गट्टी जमली. एकनाथ शिंदे यांनीही कोरोना काळात त्यांना ॲम्बुलन्स व शहर विकसित करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे आ. संजय गायकवाड हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान, त्यांचा मोबाइल फोन बंद असल्याचे दिसून आले.

दरम्यान, जळगाव जामोदचे भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुरत येथील हॉटेलवर गेले होते. परंतु, त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर त्यांचा आत प्रवेश झाला. त्यानंतर त्यांच्याशीही संपर्क होत नाहीये. जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी तर या दोन्ही आमदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले नाही ना, अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु, या चर्चेला खा. जाधव यांनी पूर्णविराम देत आपल्याला यातील काही माहिती नसून त्यांचा फोन लागत नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पेरणीत व्यस्त असलेले खा. जाधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, मेहकरचे आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी सोमवारी २० रोजी रात्री पत्नीशी संपर्क साधला असल्याचे कळाले. तसेच आ. संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. तेथे ते मुलगा कुणाल उर्फ मृत्युंजय गायकवाड यांच्यासोबत होते. तेथून ते परस्पर सुरतला गेल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...