आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार श्वेता महाले यांचा इशारा; अन्न दात्यासोबतची गद्दारी खपवून घेणार नाही

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी सन्मान योजने मार्फत जवळपास ८० हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. हजारो कोटी रुपये खतांची सबसिडी देत आहे. खत उत्पादक कंपन्या या शेतकऱ्यांच्या भरवशावर चालतात. शेतकऱ्यांशी केलेली बेइमानी ही अन्नदात्या सोबत केलेली गद्दारीच आहे. त्यामुळे जास्त नफ्याच्या नादात खते बी बियाण्यांच्या केलेला काळा बाजार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आमदार श्वेता महाले यांनी खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी, कृषी अधिकारी यांच्या संयुक्तपणे घेतलेल्या बैठकीत दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज १७ जून रोजी आमदार श्वेता महाले यांनी अधिकारी, खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन खते, बियाणे आणि औषधे विक्रीबाबत आढावा घेतला. खत कंपनी प्रतिनिधी व संबधित अधिकारी यांच्यासोबत पहिल्यांदाच एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशी बैठक घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही खत उत्पादक कंपन्यांनी जर त्यांचा पडेल माल खपवण्यासाठी लिंकिंग करत असेल, कुणी विक्रेता ज्यादा भावाने कुणी विक्री करत असेल, काळाबाजार करत असेल, कृत्रिम टंचाई करत असेल किंवा अनियमितता करत असेल तर त्याचा परवाना निलंबित न करता दंडात्मक कारवाई करावी. परवाना निलंबित केल्यास त्याला मालाची विक्री करता येत नाही, असे आमदार महाले यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सुद्धा डोळ्यात तेल घालून काम करावे
शेतकरी लुटला जात असताना यंत्रणा मात्र बसून काहीच कारवाई न करता शेतकऱ्यांवर होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहत असेल तर हे योग्य नाही. प्रशासकीय यंत्रणा ही शेतकरी, विक्रेते आणि कंपन्या यामधील दुवा आहे. त्यांनी व्यवस्थित समन्वय साधून शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मुबलक मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे. यंत्रणेने केलेले दुर्लक्ष म्हणजे कुंपणच शेत खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांनी खरीप हंगामात डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे, असे आवाहन देखील आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...