आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:खोके प्रकरणात आमदारांनी स्वत:च नार्को टेस्ट करावी ; जिल्हाध्यक्ष ॲड. काझी यांची मागणी

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून महाराष्ट्रात पन्नास खोक्याचे राजकारण चांगलेच तापत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पन्नास खोके एकदम ओके, असे सर्वदूर उघड बोलले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होण्यासाठी ज्यांच्यावर हे आरोप आहेत, त्यांनी स्वत:हून नार्को टेस्ट करुन घ्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणाचा खुलासा होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष पन्नास खोके प्रकरणावर आहे. आ. रवी राणा व बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, माझ्या एका फोनवर बच्चू कडू गेले त्यामुळे जनतेचा संभ्रम वाढतच चालला आहे. ज्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप होत आहे. त्यांनी नार्को टेस्ट करुन घ्यावी. या खोके प्रकरणातील सत्य काय ते बाहेर येवून या वादावर पडदा पडेल. सर्व आमदार व संबधित नेते मंडळी हे नार्को टेस्ट करुन घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सतीश काळे, जगन सहाने, अमोल भट, सीताराम चौधरी, विजय तायडे, शेख यासीन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...