आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या फोटोला बुलडाण्यात मनसेचे जोडेमारो आंदाेलन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखीच चिघळला असून कायदेशीर लढाई आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे.

त्याचे पडसाद बुलडाण्यात उमटले असून मनसे आक्रमक झाली आहे. संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे तालुका अध्यक्ष अमोल रिंढे यांच्या नेतृत्वात बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. राज्यात विविध संघटना व पक्षाकडून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. त्या पाठोपाठ आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान बुधवारी मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांच्या उपस्थित शहरातील धाड नाका चौकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या फोटोला जोडे मारून कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, आशिष गायके, आकाश हुडेकर, शाकीर शहा, गोपाल गिरी, दर्पणसिंग ठाकूर, गणेश पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...