आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते संतप्त:एमएसईबी चौकातील खड्ड्यांचे पूजन करून मनसेचे आंदोलन

शेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील एक महिन्यापासून शहरातील एमएसइबी चौकात भला मोठा खड्डा पडला आहे. अद्यापही हा खड्डा दुर्लक्षित असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. परंतु पालिका प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज ५ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता खड्याला हार टाकून त्याची पूजा केली. तसेच खड्यात बेशरमचे झाड लावून प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व तहसीलदारांना निवेदन दिले.

त्यांनी दिलेल्या निवदेनानुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या शहरातील एमएसइबी चौकात पेव्हर ब्लॉक उखडल्याने त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. पाच फूट खोल पडलेल्या या खड्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.

तरीही बांधकाम विभाग या खड्यांच्या दुरूस्तीकडे कानाडोळा करत आहे चोवीस तासांच्या आत हा खड्डा न बुजवल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मनसे तालुका प्रमुख रवींद्र उन्हाळे, शहर प्रमुख अमित देशमुख, नारायण शेगोकार, परमेश्वर राहुडकर, मनीष जाणे, रामेश्वर भारती, बाळू भोईटे, विनोद टिकार, भास्कर खेळकर, दिगंबर खेळकर यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...