आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात होणाऱ्या पिवळ्या आणि अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष नारायणबापू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी, दि. २८ रोजी नगर पालिकेला निवेदन दिले. पालिकेने शुद्ध, स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. अशुद्ध तसेच पिवळ्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, अनेकांना किडनी स्टोन, पोटाच्या विकारांसह इतर आजार झाले आहेत. पालिका प्रशासन दरवर्षी नळ धारकांकडून पाणी कर वसूल करते. परंतु, वर्षातून केवळ १० ते २० दिवसच पाणी पुरवठा करते. नागरिकांना काही दिवसच पाणीपुरवठा होत असून, नळपट्टी पूर्ण वर्षभराची आकारली जात आहे.
त्यामुळे शुद्ध, स्वच्छ आणि नियमितपणे तीन-चार दिवसांआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दूषित व अशुद्ध व पिवळ्या पाण्याचा पुरवठा केला जातो, असे या निवेदनात म्हटले आहे. शहरास स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना नारायणबापू देशमुख, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप शहराध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल अस्वले, अंकित कापसे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.