आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाची शिक्षा:अल्पवयीन मुलीची छेड; आरोपीला दोन वर्षाची शिक्षा

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी तीन आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. यामधील मुख्य आरोपीला दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली. तालुक्यातील पिंप्री गवळी येथील घटना असून खामगाव न्यायालयाने आज १५ डिसेंबर रोजी हा निकाल दिला. तालुक्यातील पिंप्री गवळी येथील अल्पवयीन पीडिता ही २८ मार्च २०१८ रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शाळेत जाण्याकरता बस स्टॉप वर उभी असताना अक्षय हरिदास पोरे याने अश्लील हावभाव करून चिडवले व उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली. तसेच या घटनेच्या अगोदर पासूनच सदर आरोपी हा पीडितेचा विनाकारण पाठलाग करून अश्लील हावभाव करत करत होता.

सदर बाब पीडितेने आई-वडिलांना सांगितली असता ते जाब विचारण्यासाठी घरी गेले असता अक्षय पोरे, हरिदास विठ्ठल पोरे व प्रमोद हरिदास पोरे या तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशी तक्रार अल्पवयीन पीडितेने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिन्ही आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल केला.

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गाडे यांनी केला तर या प्रकरणाची चौकशी करून दोषारोप पत्र पोलिस उपनिरीक्षक संतोष माने यांनी न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी १५ डिसेंबर रोजी खामगाव न्यायालयात करण्यात आली. तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.कुळकर्णी यांनी याप्रकरणी निकाल दिला.

सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता व तिच्या वडिलांची साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियंता प्रशांत लाहूडकर यांनी युक्तिवाद केला तर महिला पोहेका चंदा शिंदे यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले. विद्यमान न्यायालयाने दोषारोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय पोरे यास कलम ३६४ डी, सह कलम १२ पोक्सो नुसार दोन वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास चार महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच आरोपी अक्षय पोरे, हरिदास पोरे व प्रमोद कोरे या तिघांना प्रत्येकी कलम ३२३ भादंवी मध्ये सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड तर दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी. तसेच कलम ५०६ भादंवी मध्ये सहा महिने फक्त मजुरी शिक्षा व एक महिना दंड तर दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी शिक्षा सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...