आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीस व तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली. त्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता संबधीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्या तरुणास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील धोंगर्डी येथील शुभम राजेंद्र गावंडे (३६) या तरुणाने नात्यातीलच अल्पवयीन मुलीला सार्वजनिक वाचनालय जवळ गाठले व तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ डिसेंबर रोजी घडली. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार तिच्या आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर मलकापूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी शुभम राजेंद्र गावंडे विरुद्ध २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपी शुभम गावंडे याने ३० डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी घरातील उंदीर मारण्याकरिता आणलेले औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रतनसिंह बोराडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...