आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाची मागणी:अंत्यसंस्कार करण्यासाठी केली जाते पैशाची मागणी

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगणे प्रचंड खडतर असते, अनेकदा ते वेदनादायी देखील होते. त्यातूनच मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. अशी आर्त भावना शहरातील राऊतवाडी भागातील स्मशान भूमीत ऐकायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मृतदेहाच्या अंत्य संस्कार करण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांकडे चक्क पैशांची मागणी हाेत असल्यामुळे समाज मनात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील राऊतवाडी परिसरातील एका तीस वर्षीय युवकाचा बुधवारी अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. गुरुवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुःखात बुडालेले नातेवाइक अंत्यसंस्कार करून परत जात असतानाच स्मशानभुमीची देखरेख करणाऱ्या मधुकर थोरात या कामगाराने मृताच्या नातेवाइकांकडे पैशांची मागणी केली. ही संतापजनक बाब या भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन शेटे यांनी उघडकीस आणली. अंत्यविधीच्या वेळी दुःखात बुडालेल्या मृताच्या नातेवाइंकाकडे पैशाची मागणी होत असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पैसे मागण्याचे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार
शहरातील राऊतवाडी समशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी २५१ रुपयांची वसुली करणे म्हणजे मृताच्या वाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. या बाबत त्या कामगारास विचारणा केली असता त्याने गावंडे नामक व्यक्तीने आपल्याला येथे कामाला ठेवल्याचे सांगितले.-सचिन शेटे, सामाजिक कार्यकर्ता

बातम्या आणखी आहेत...