आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:मोरबी येथील पूल अपघात गुजरातच्या भ्रष्टाचाराचे फळ; काँग्रेसचे खा. मुकुल वासनिक यांचा आरोप

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या मोरबीत घडलेला अपघात हा गुजरातमधील भ्रष्टाचाराचे फळ असल्याचा आरोप काँग्रेसचे खा. मुकुल वासनिक यांनी केला.१८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेसचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते शेगावात पोहोचून नियोजन आणि रस्त्यांचा आढावा घेत आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्यसभेचे सदस्य खासदार मुकुल वासनिक यांनी रविवारी शेगाव शहरात भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भारत जोडो यात्रा ही संपूर्ण देशाला जोडणारी ठरणार आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

खा. वासनिक म्हणाले की, पूल दुरुस्तीचे काम सुरू होते मात्र काम पूर्ण होण्याच्या आधीच पूल सुरू करण्यात आला. त्यानंतर अपघात घडला. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. तेथील सरकारने तिकीट विक्री व वेल्डिंग करणाऱ्या किरकोळ लोकांना, मजूर लोकांना पकडले. पूल सुरू करण्याचे आदेश देणाऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही. हे गुजरात मॉडेलचे मोठे उदाहरण आहे.

या पुलाच्या बांधकामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळेच शेकडो लोकांचे जीव गेले, असा आरोप करत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबद्दल बोलण्यापेक्षा गुजरातच्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे, असे आवाहनही खा. मुकुल वासनिक यांनी मोदींना केले.

भारत जोडो यात्रेतील सभा सर्व विक्रम मोडणार
देशात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा १८ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यात येणार आहे. नंतर मध्य प्रदेशात जाणार आहे. या निमित्ताने शेगावात होणारी जाहीर सभा ही आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार असल्याचे मुकुल वासनिक यांनी सांगितले. यावेळी वासनिक यांचे बुरुंगले परिवाराच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...