आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता दहावीच्या आगामी परीक्षेसाठी आयसीआय क्लासेसच्या वतीने आज, दि. ५ फेब्रुवारी रोजी स्कॉलरशीप चाचणी पार पडली. येथील सातेफळ मार्गावरील शिंगणे नगरातील अस्मिता लॉन्ससह सिंदखेडराजा, दुसरबीड, बिबी व साखरखेर्डा येथे ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये तीन टप्प्यांमध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयसीआय क्लासेसच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयसीआय क्लासेसचे संचालक प्रा. विनायक फुके मार्गदर्शनात ही परीक्षा घेण्यात आली. मागील काळात प्रा. फुके आणि त्यांच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर सॉफ्टवेअर द्वारे तपासले जाणार आहेत. अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी, बारावीसाठी आयसीआय क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाणार आहे, अशी माहिती क्लासेसचे संचालक प्रा. विनायक फुके यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.