आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:‘जन्मदिनी वृक्ष लाऊ अंगणी’ चळवळीच्या माध्यमातून जगवली दहा हजारांहून अधिक झाडे; पक्ष्यांसाठीही केली दाणापाण्याची व्यवस्था

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन्यजीव सोयरे करताहेत जंगलातील प्लास्टिक उचलण्याचे काम

वनजमीनीवर होणारे अतिक्रमण व होत असलेली वृक्षतोडीमुळे कधीकाळी‘हिल स्टेशन’असलेल्या बुलडाणा जिल्ह्याने यावेळी तापमानात उच्चांक गाठला होता. अजिंठा पर्वतरांगा व ज्ञानगंगा अभयारण्यासोबतच जळगाव कडून गेलेला सातपुडयाचा कडाही जिल्ह्यास वरदान होता. मात्र झालेल्या वृक्षतोडीमुळे खचून न जाता बुलडाणा शहरात पर्यावरण मित्र मंडळ पाच वर्षापूर्वी ऊभे राहिले व‘जन्मदिनी वृक्ष लाऊ अंगणी’ही चळवळ सुरू झाली.

दोन वर्ष कोरोनाचे वगळता उर्वरीत वर्षात शहरात दहा हजाराहून अधिक वृक्ष लागवड करून ते जगवण्याचे काम या मंडळाने केले. या सोबतच पक्षी जीवंत राहिले पाहिजे म्हणून दाना-पणी व्यवस्थेसाठी २५० पॉट परिसरात लावण्यात आले. ही चळवळ सुरू असतानाच जंगल स्वच्छतेचे काम वन्यजीव सोयरे यांच्यामार्फत सुरु करण्यात आली.

‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी” ही संकल्पना बुलडाणा शहरात सुरू करून बुलडाणा शहरातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांच्या घरी जाऊन, खड्डा खोदून, झाडे पर्यावरण मित्र लावतात. आतापर्यंत ह्या माध्यमातून पर्यावरण मित्रांनी दहा हजारांहून अधिक झाडे लावलेली आहे. वाढदिवसाला झाड लागत असल्याने ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीच्या भावना त्या झाडाला जोपासण्यासाठी मदतीची ठरते. त्यामुळे ती व्यक्ती वाढदिवसाला लावलेले झाडाचे मुलाप्रमाणे संगोपन करून वाढविते.त्यामुळे पर्यावरण मित्रांनी लावलेल्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जगलेली आहे.

सोबत “वृक्ष वेदना मुक्ती”अभियान राबवून झाडांमध्ये जाहिरात करण्यासाठी लावलेली हजारो खिळे काढून झाडांना वेदनामुक्त केले आहे.ह्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी २५० ठिकाणी दाना-पाणी पुण्यपात्र लावून पक्ष्यांची तहान भागवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यजीव सोयरेंनी ५ जून २०१६ रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून ३५ पोते दारूची काचेची बॉटल उचलून प्लास्टिक कचरा उचलला.

५ जून २०१७ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ४ जून २०१७ रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून २२ पोते दारूची काचेची बॉटल उचलून प्लास्टिक कचरा उचलला. ३ जून २०१८ रोजी मोहिम आखून पुन्हा २२ पोते दारूची बॉटल आणि प्लास्टिक कचरा उचलला. ५ जून २०१९ रोजी मोहिम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून ३० पोते दारूच्या, बिअरच्या बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्या जमा केल्या. ७ जून २०२० रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून २८ पोते तसेच ५ जून २०२१ रोजी मोहिम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून १४ पोते दारूची काचेची बॉटल उचलून प्लास्टिक कचरा उचलला त्याचा पाठपुरावा आणि वन्यजीव सोयरेंच्या बॉटल मोहिमेचा असर किती प्रमाणात झाला याची शहानिशा करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविलारी मोहीम आखलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...