आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोताळा ते मलकापूर मार्गावर शाळा, विद्यालय तथा महाविद्यालय, पेट्रोलपंप असल्याने या मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघातांची संख्या वाढली होती. या बाबत दैनिक दिव्य मराठीने २७ डिसेंबरच्या अंकात मोताळा ते मलकापूर मार्गावर नेहमी होताहेत गतिरोधका अभावी अपघात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने सहकार विद्या मंदिर शाळेसमोर गतिरोधक टाकले आहे. त्यामुळे वाहनधारकासह विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मोताळा ते मलकापूर या मार्गावर बँका, शाळा, विद्यालय तथा महाविद्यालय, पेट्रोलपंप आहे. त्यामुळे या मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांसह दुचाकी वाहन धारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच हा मार्ग पुढे महामार्गाशी जोडल्या जात असल्याने जड वाहनांसह हजारो वाहने या मार्गावरून रात्रंदिवस भरधाव जातात. परंतु या मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण राहत नव्हते. बँकेत व्यवहार करण्यासाठी येणारे नागरिक तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाणारी वाहने, या मार्गाला लागूनच असलेल्या शाळांमध्ये तसेच शाळेच्या प्रांगणात खेळणारी मुले यांच्यासोबत अपघात घडण्याची शक्यता बळावली होती.
तसेच मागील काही दिवसांपासून या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामध्ये अनेकांचा बळी गेला असून त्यामुळे या मार्गावर शाळा तसेच बँका, पेट्रोलपंपाजवळ गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत होते. याबाबत २७ डिसेंबर रोजी दैनिक दिव्य मराठीने मोताळा ते मलकापूर मार्गावर नेहमी होताहेत गतिरोधका अभावी अपघात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते.
या वृत्ताने खळबळून जागे झालेल्या बांधकाम विभागाने या मार्गावरील सहकार विद्या मंदिर शाळेसमोर गतिरोधक टाकले आहे. तर याच मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने उर्दू हायस्कूल, दुसऱ्या बाजूने कन्या शाळा आहे. तर शाळेला लागून काही अंतरावर पेट्रोलपंप आहे. त्यामुळे याठिकाणी सुद्धा गतिरोधकाची आवश्यकता आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.