आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरुन येत असलेल्या मोटार सायकलीस जबर धडक दिली. या अपघातात मोटार सायकलीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोताळा- बुलडाणा मार्गावरील मूर्ती फाट्याजवळ बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील वाघजाळजवळ परडा शिवारात मेंढ्यांचे वाडे आहेत. या वाड्यावर जाण्यासाठी साखळी येथील संतोष जोशी हे त्यांचे सहकारी गजानन दातार यांच्यासह एमएच २८ एक्यू ३३१६ या क्रमांकाच्या मोटार सायकलीने बुलडाण्याकडून येत होते. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मूर्ती फाट्याजवळ येताच त्यांच्या मोटार सायकलीस समोरून भरधाव येणाऱ्या टी. एन. २८/ बी. ए. / १६९४ या क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात मोटार सायकलीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार पाटील, उपनिरीक्षक अनिल भुसारी, एएसआय यशवंत तायडे, पोकॉ अभिनंदन शिंदे, पोकॉ सुनील भवटे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील दोन्ही जखमींना नागरिकांच्या मदतीने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवले. त्याठिकाणी तपासणी करून डॉक्टरांनी गजानन दातार यांना मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी असलेले संतोष जोशी यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान संतोष जोशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वृत्त लिहिपर्यंत ट्रक चालकाविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.