आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगळद शिवारातून नळगंगा नदी पात्रातून साडेसात एच.पी. क्षमतेची पाणबुडी मोटार अंदाजे २० हजार रुपये किमतीची लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार जणांवर संशय असल्याची बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील तळणी येथील विजय खर्चे यांची त्यांच्या वडिलांच्या नावे तळणी शिवारात गट क्र.१९८ मध्ये ९ एकर बागायती शेती आहे. शेतीला पाणी देण्यासाठी विजय खर्चे यांनी नळगंगा धरणाच्या पात्रात साडेसात एचपी क्षमतेची २० हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार बसवली असून धरणापासून शेतापर्यंत पाइपलाइन केलेली आहे. सध्या खर्चे यांच्या शेतातील पिकांची सोंगणी झालेली आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पाण्याचे काम नाही.
त्यामुळे विजय खर्चे मोटार काढण्यासाठी नळगंगा धरण पात्रात गेले असता त्यांना त्याठिकाणी मोटार दिसली नाही. तसेच मोटारीची वायर सुद्धा कापलेली दिसली. याबाबत आसपासच्या परिसरात मोटारीचा शोध घेतला असता मोटार कोठेही दिसून आली नाही.त्यामुळे मोटार चोरी झाल्याचा संशय खर्चे यांना आला. सदर मोटार तळणी येथील प्रदीप खानंदे, महेंद्र गुरचळ, संदीप शेले व रामेश्वर तायडे या चार जणांनी चोरल्याचा संशय असल्याची तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पीएसआय प्रल्हाद वानखेडे, ज्ञानेश्वर धामोडे हे करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.