आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथसंचलन:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​येथे सुरू असलेल्या द्वितीय वर्षाच्या स्वयंसेवकांचे अभ्यास पथसंचलन २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आले होते. शिस्तबद्ध पध्दतीने निघालेले पथसंचलन अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

विविध सामाजिक संघटनांकडून पथसंचलनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले. यवतमाळ शहरातील विकमसी चौक, टिळक पुतळा, महावीर चौक, जगदंबा चौक, अग्रसेनचौक, शहर पोलिस स्टेशन, श्री गुरूद्वारा सिंघ सभा, बसस्थानक चौकमार्गे हे पथसंचलन करण्यात आले. शहरातील जे. व्ही.मेहता, न्यू ईरा विद्यालयातून पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली होती. या पथसंचलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

बातम्या आणखी आहेत...