आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृगधारा:बुलडाण्यात बरसल्या मृगधारा ; जीवितहानी नाही, मात्र घराचे नुकसान

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या वरुण राजाने उशिरा का होईना आज ११ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात करून दिली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून शहरवासीयांची सुटका झाली आहे. दरम्यान पाऊस सुरू असतांनाच सुंदरखेड येथील एका घरावर वीज कोसळली. या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नाही. परंतु इमारतीच्या स्लॅब वरील संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसापासून सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली होती. अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या या दाहकत्या उन्हामुळे नागरीक त्रस्त झाले होते. त्यामुळे प्रत्येक जण चातकासारखी पावसाची वाट पाहत होता. परंतु प्रत्येक उजाडणारा दिवस कोरडा जात असल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. दरम्यान आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आकाशात काळे कुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून शहर वासियांची सुटका झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...