आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी कारभार:महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज; सताड उघडी विद्युत रोहित्रे देताहेत अपघातास निमंत्रण

धामणगाव बढेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसापासून येथील वीज वितरण कंपनीचा कारभार हा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. वीज अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज ग्राहकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून आहे. विद्युत रोहित्रांची दारे ही सताड खुलीच राहत आहेत. एवढेच नव्हे तर त्यात फ्यूज राहत नसून फक्त ताराची जोडणी केली आहे. तर अनेक पेट्या मध्ये नुसत्या वायरी जोडण्यात आल्या आहेत.

त्यामुळे गावातील अनेक भागात कमी दाबाचा वीज पुरवठा, वारंवार फ्यूज जाणे व स्पर्किंग होऊन शॉट सर्किट होणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावातील वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर उर्वरित असणारे रोहित्रही वारंवार जळत असल्याने पूर्ण गाव अंधारात राहण्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे वीज कंपनीच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. परंतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार सतत घडत आहेत. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांना विजेची उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत.

तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. या गंभीर बाबीकडे वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सतत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. परंतु याचे काहीच देणे घेणे महावितरणच्या अधिकाऱ्यांना नाही. विजेचा परिणाम उद्योगावर होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने विजेची समस्या सोडवणे गरजेचे झाले आहे.

मेंटनन्सच्या कामाचा पडला विसर : पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज कंपनीच्या वतीने मेंटनन्सची कामे करण्यात येतात. परंतु पावसाळा तोंडावर आला असतानादेखील महावितरणकडून अद्याप कुठले मेंटनन्सची कामे करण्यात आली नाही. वास्तविक पाहता मेंटनन्सची कामे ही ३१ मे पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही या कामांना सुरूवात करण्यात आली नाही. परिणामी अनेक ठिकाणच्या वीज प्रवाहित तारा ह्या लोंबकळत असून तारामधून झाडांच्या फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे फ्युज उडणे, सतत वीज पुरवठा खंडीत होणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

उघड्या पेट्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
गावातील लहान मुले खेळता खेळता या बॉंक्समधील फ्युजला हात लावू शकतात. अशावेळी लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यता असते. या संभाव्य धोक्याची कल्पना वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असते. तरी सुध्दा कुठल्याच उपाययोजना करण्यात येत नाही. यावरून उघड्या पेट्याकडे वीज अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

किरकोळ दुर्घटनाचे प्रमाण वाढले,
पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर्वी मेंटेनन्स होणे गरजचे असताना येथील मेंटेनन्स शुन्य आहे. त्यातच वीज कंपनीने ठिकठिकाणी जे विद्युत पेट्या बसवल्या आहेत. त्यापैकी बहुतांश पेट्याची दारे केव्हाचीच तुटली आहेत. परिणामी एबी स्विच खराब असल्यामुळे अनेक किरकोळ दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहेत.

ग्रामस्थांनी वारंवार कल्पना देवुन ही डिपीची दुरुस्ती केली जात नाही. सताड उघडी वीज पेटीची दारे ही मृत्युची दारे ठरत आहेत. त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वीज कंपनीने या भोंगळ कारभाराकडे वेळीच लक्ष देऊन संभाव्य जीवितहानी टाळावी, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...