आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची टाळाटाळ:महावितरण कंपनीला थकीत बिलांचा ‘शॉक’, वीज पुरवठा करणे कठीण, ग्राहकांकडे तब्बल 1, 742 कोटींची थकबाकी

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान, कोरोनामुळे थांबलेले अर्थचक्र, दिवसागणिक वाढत जाणारी महागाई यासह इतर कारणांमुळे घरगुती, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकीत वीज बिलाचा भरणा करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे दिवसागणिक वीज वितरण कंपनीच्या थकीत बिलाचा आकडा झपाट्याने फुगत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार २७७ वीज ग्राहकांकडे तब्बल १ हजार ७४२ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. एवढी मोठी थकबाकी असल्याने वीज कंपनीला विविध ग्राहकांना वीज पुरवठा करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांमुळे असंख्य गोरगरीबांच्या घरात उजेड पडला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ लाख २९ हजार २७७ वीज ग्राहक आहेत. त्यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शेतकरी, पाणी पुरवठा ग्राहकांचा समावेश आहें. कोरोनासारख्या गंभीर काळातही वीज वितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना नियमित विजेचा पुरवठा केला आहे. परंतु मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे सोयाबीनसह इतर पीके मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. त्यातच दिवसागणिक महागाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांना पोटाची खळगी भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे असंख्य ग्राहकांनी आपल्या कडील थकीत वीज बिलाचा भरणा करण्यास टाळाटाळ केली आहे. परिणामी वीज कंपनीचा थकीत बिलाचा आकडा दिवसागणिक झपाट्याने फुगत आहे. जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार २७७ वीज ग्राहकांकडे तब्बल १ हजार ७४२ कोटी १२ लाख रूपयांची थकबाकी आहे.

त्यामध्ये वीज पंपाची तब्बल १ हजार ३४० कोटी एवढी थकबाकी असून एवढी मोठी थकबाकी असल्याने वीज कंपनीला शेती पंपाला वीज पुरवठा करण्यास अडचणी जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...