आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी:मुक्ताईंच्या पालखीचा 700 किमी.चा प्रवास ; मुक्ताईनगरातून प्रयाण, मलकापुरात पोहोचणार 5 जूनला मुक्ताईची पालखी

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मुक्ताईनगर ते पंढरपूर असा ७०० किलोमीटरचा प्रवास या पायी वारीचा असणार आहे. हा पालखी सोहळा संत मुक्ताईचे समाधी स्थळ असलेल्या कोथळी, मुक्ताईनगरातून ३ जूनला पंढरपूरकडे रवाना होईल, मलकापूर येथे ५ जून रोजी पोहोचणार आहे. संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या खान्देशातील, विदर्भातील व मध्य प्रदेशातील वारकऱ्यांना दोन वर्षाच्या खंडानंतर पायी वारीचा परमोच्च आनंद यंदा घेता येणार आहे. संत मुक्ताईची आषाढी वारी पालखी ५ जून रोजी विदर्भाचे प्रवेशद्वार मलकापूर येथे मुक्काम करुन सोमवार ६ जून रोजी सकाळी पुढील ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. ५ जुलै रोजी म्हणजेच. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये तब्बल ३३ दिवसांत ७०० किमी पायी प्रवास करून ५ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या तीन दिवस आधीच ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. पंढरपुरातील मुक्ताई मठात पालखीचा विसावा राहणार आहे. भक्तगणांकडून जय्यत तयारी : यंदा संत मुक्ताईचे समाधी सप्त शतकोत्तर वर्ष आहे. त्यामुळे वारीत भाविकांची संख्या वाढेल, असा कयास आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरु आहे.

आठ दिवस मुक्ताई पालखी पंढरीत यंदा तिथीत वाढ असल्याने तीन दिवस अगोदर आषाढ शुद्ध षष्ठीस पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल. त्यामुळे वारकऱ्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचे दर्शन घेता येईल. आठ दिवस मुक्ताई पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असेल. संत मुक्ताई पालखीचे अनन्य महत्त्व राज्यात सर्वाधिक लांब अंतरावरून पायी येणारी ही एकमेव पालखी आहे. जवळपास ७०० किमी एका बाजूने प्रवास या पालखी सोहळ्याचा असतो. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यापेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते.

बातम्या आणखी आहेत...