आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:पालिका पदाधिकारी, नागरिकांचा‎ मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या‎

लोणार‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आझाद नगर प्रभाग‎ क्रमांक एकमध्ये स्वच्छता करण्याची‎ मागणी करूनही समस्या सोडवण्यात‎ आली नाही. त्यामुळे या प्रभागाच्या‎ नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा‎ रंजना राजेश मापारी आणि बांधकाम‎ सभापती नसीमबानो कुरेशी यांचे पती‎ मोहम्मद तौफिक कुरेशी यांनी आज,‎ दि. २ मार्च रोजी नगर पालिका‎ मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या‎ आंदोलन केले.‎ नगर पालिका प्रशासनाला वारंवार‎ विनंती करूनही आझाद नगर प्रभाग‎ क्रमांक एकमध्ये रस्ते आणि नाल्या‎ बनवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎ परिसरात घाण आणि सांडपाणी‎ साचले आहे.

या प्रभागात मुस्लिम‎ वस्ती मोठ्या प्रमाणात असून,‎ ले-आऊटधारकांनी नालीसाठी जागा‎ न सोडल्यामुळे घरांसमोर सांडपाणी‎ साचले आहे. यामुळे आरोग्याचा‎ समस्या निर्माण होत आहे. घाण‎ आणि सांडपाणी तसेच इतर समस्या‎ आणि विकासकामांकडे पालिका‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या‎ पार्श्वभूमीवर नगरसेविका रंजनाताई‎ मापारी आणि मोहम्मद तौफिक‎ कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना‎ मागील महिन्यात निवेदन दिले होते.‎ प्रभाग एक मधील समस्या‎ सोडवण्याची मागणी केली होती.‎ परंतु, १५ दिवस होऊनही समस्या‎ सोडवल्या नाही.‎

बातम्या आणखी आहेत...