आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:नगर पालिकेची कामे निकृष्टॉ ; ​​​​​​​नगरसेविका नंदा मेहेत्रे यांचा आरोप

सिंदखेडराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या वतीने शहरात शासनाच्या विविध योजनेंतर्गत सुरू असलेली व पूर्ण झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका नंदा मेहेत्रे व माजी सभापती आशामती मेहेत्रे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी २९ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी अधिकारी, अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका नंदा मेहेत्रे, आशामती मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे, कैलास मेहेत्रे, दिलीप काळे, प्रकाश मेहेत्रे, रामेश्वर घटोळकर, विनोद झोरे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...