आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिनीचा जाळून‎ खून:विवाहितेचा खून;‎ आरोपीस कारावास‎

खामगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागेच्या वादातून वहिनीचा जाळून‎ खून केल्याप्रकरणी आरोपीस‎ आजन्म कारावासाची शिक्षा तसेच‎ २० हजार रुपये दंड ठोठावण्यात‎ आला. ही घटना खामगाव‎ तालुक्यातील गणेशपूर येथील आहे.‎ हा निकाल येथील जिल्हा न्यायालय‎ क्रमांक एक तथा अतिरिक्त सत्र‎ न्यायाधीश अनुजा सागर वैरागडे‎ यांनी ४ फेब्रुवारी रोजी दिला आहे.‎ तालुक्यातील गणेशपूर येथील‎ आरोपी पांडुरंग मनोहर लथाड वय‎ २० याने २६ नोव्हेंबर २०१६ रोजी‎ पहाटे ४ वाजता त्याची वहिनी दुर्गा‎ गुणवंत लथाड वय २६ हिच्या घरात‎ अनधिकृतपणे प्रवेश करून‎ तिच्याशी जागेवरून वाद घातला.‎

त्यानंतर त्याने जीवे मारण्याच्या‎ उद्देशाने वहिनीच्या अंगावर घासलेट‎ ओतून तिला पेटवून दिले. याबाबत‎ २७ नोव्हेंबर २०१६ मृत्यूपूर्व‎ जबानीवरून तसेच पोलिस‎ कर्मचारी संजीव जाधव यांच्या‎ तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी‎ पांडुरंग लथाडविरुद्ध खुनाचा गुन्हा‎ दाखल करून त्याला अटक केली‎ होती. घटनेचा तपास सपोनि नरेंद्र‎ डंबाळे यांनी करून दोषारोपपत्र‎ येथील न्यायालयात दाखल केले.‎

दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी येथील‎ न्यायालयात या खून प्रकरणाची‎ सुनावणी झाली. यावेळी ११‎ साक्षीदार तपासण्यात आले.‎ साक्षीदारांची साक्ष व अतिरिक्त‎ शासकीय अभियोक्ता यांचा‎ युक्तिवाद ग्राह्य धरत येथील‎ अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या‎ न्यायाधीश अनुजा सागर वैरागडे‎ यांनी पांडुरंग गुणवंत लथाड यास‎ आजन्म कारावासाची शिक्षा व २०‎ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली‎ आहे.‎ दंडातील १० हजार रुपये रक्कम‎ घटनेमुळे पीडित झालेल्या व्यक्तींना‎ देण्यात येणार असल्याचे निकालात‎ नमूद केले आहे. या प्रकरणी‎ सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त‎ शासकीय अभियोक्ता रजनी‎ बावस्कर यांनी काम पाहिले. तर‎ त्यांना कोर्ट पैरवी म्हणून हिवरखेड‎ पोलिस स्टेशनचे संतोष घनोकार‎ यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...