आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:घराकडे पाहतो म्हणून कुऱ्हाडीने घाव घालून युवकाचा खून; पिंपळगाव काळेतील घटना

जळगाव जामोद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत घराकडे का पाहतो, या कारणावरून एका सव्वीस वर्षीय युवकाचा चार जणांनी कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दि.३ एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, आज युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तालुक्यातील पिंपळगाव काळे शिवनगर येथील रहिवासी सुपेश किसन राऊत वय २६ हा आरोपीच्या घरासमोरून शेतात जात असताना आरोपींनी ‘तू आमच्या घराकडे का पाहतो’, अशी विचारणा केली.

त्यानंतर सुपेश व संबंधित आरोपींमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपी क्रीष्णा रमेश वरणकार याने सुपेश राऊतच्या मानेवर व पाठीवर कुऱ्हाडीचे वार केले. तर अजय क्रिष्णा वरणकार, गणेश वरणकार व हरिदास वरणकार या तीन भावांनी सुपेश राऊत याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

या हाणामारीत कुऱ्हाडीचे घाव वर्मी लागल्याने सुपेश राऊत याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत सुपेश याचा भाऊ अजय राऊत याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आज बुधवारी सर्व आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कैलास चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...