आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाना-नानी पार्क आज पुन्हा होणार खुला‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही महिन्यांपासून बंद असलेले ‎ जलंब-वाडी रोडवरील नाना-नानी पार्क ६ ‎जानेवारीपासून पुन्हा नागरिकांसाठी खुला‎ होणार आहे.स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचा‎ ड्रिम प्रोजेक्ट असलेले नाना-नानी पार्क ‎खामगावची शान असून आबालवृध्दांसाठी हे ‎विरंगुळ्याचे ठिकाण आहे. याठिकाणी‎ निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्याकरता‎ मोठया प्रमाणावर झाडी लावण्यात आली‎ असून लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच ‎खेळणी सुध्दा आहेत. तसेच जॉगिंग ट्रॅकसह, ‎विस्तीर्ण लॉन्स, आकर्षक अशा मूर्ती व‎ विविध प्रकारे या गार्डनचे सुशोभीकरण‎ करण्यात आले आहे.‎ याठिकाणी मागील काही महिन्यांपासून‎ झाडे लावण्यासह देखभाल व दुरुस्तीचे काम‎ सुरु होते. यामुळे नाना-नानी पार्क‎ नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.‎

दरम्यान ही सर्व कामे पूर्ण झाली असून‎ नाना-नानी पार्क ६ जानेवारीच्या‎ सायंकाळपासून नागरिकांसाठी खुला केल्या‎ ‎‎ जाणार आहे. तरी आबाल-वृध्दांनी‎ नाना-नाकी पार्कचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

नाना- नानी पार्क.‎
सुरक्षा रक्षकाची नेमणूक‎ नाना-नानी पार्क पुन्हा सर्वांसाठी खुले करण्यात‎ येत आहे. याठिकाणी आता देखरेख व‎ असामाजिक तत्वांना रोखण्यासाठी सुरक्षा‎ रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.‎ नागरिकांनी सुशोभिकरणाचा लाभ घ्यावा, मात्र‎ या सुशोभिकरणास कुठलीही बाधा पोहोचवू‎ नये, झाडांची, मूर्तींची नासधूस करु नये. कुणी‎ असे केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली‎ जाईल, असे आवाहन मुख्याधिकारी मनोहर‎ आकोटकर यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...