आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संकटात:नांदगाव खं. तालुक्यात मुसळधार पाऊस; सोयाबीन, तूर, कापसाचे पीक पाण्याखाली

नांदगाव खंडेश्वर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असून, हजारो हेक्टरमधील सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पाण्याखाली आली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.जुलै महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतेक शेती पाण्यात बुडाली होती. त्यानंतर १५ ते २० दिवस पावसाचा खंड पडल्याने उघडीप मिळाली. परिणामी पिके बऱ्यापैकी वाचवली गेली. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सावनेर, पळसमंडळ, खंडाळा, मोखड, धामक, येवती, सुलतानपूर, बेलोरा, मांजरी म्हसला या गावांसह तालुक्यातील शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून, सोयाबीन व कापूस ही पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतात साचलेल्या पावसाने तुरीचे पीक जळून गेले आहे. दरम्यान, पाऊस असाच सुरु राहिल्यास शेतकऱ्यांना या वर्षीसुद्धा ओला दुष्काळासारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, अशी मागणी समोर येत आहे.

बातम्या आणखी आहेत...