आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक‎ रांगोळी स्पर्धा व निबंध:श्री शिवाजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान‎ दिवस उत्साहात साजरा‎

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ‎ महाविद्यालय बुलडाणा येथे साजरा करण्यात आला.‎ यावेळी शाळेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन‎ करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक‎ रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात‎ आले होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध‎ वैज्ञानिक उपकरणे मांडली होती तर वैज्ञानिक रांगोळी‎ स्पर्धेमध्ये वैज्ञानिक रांगोळी विद्यार्थ्यांनी काढल्या‎ होत्या. शाळेच्या वतीने स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून‎ उत्कृष्ट स्पर्धकाचा क्रमांक काढून त्यांना पुरस्कार व‎ प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.यासाठी शाळेचे‎ विज्ञान शिक्षक नगराळे, निकस, सिरसाट व श्रीमती‎ मेहेर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...