आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनसीसी युनिटची वार्षिक तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र एनसीसी बटालियन अकोल्याचे लेफ्टनंट कर्नल सी. पी. बदोला यांनी येथील एमइएस कला व वाणिज्य महाविद्यालय व हायस्कूल व ज्यु कॉलेज तसेच श्री शिवाजी हायस्कूलला भेट देवून या तीनही कॉलेज व शाळांमधील एनसीसी विभागाची तपासणी केली.
यावेळी लेफ्ट कर्नल बदोला व त्यांच्या पथकाने प्रथम एमइएस वरिष्ठ महाविद्यालयाच्या तपासणीला सुरुवात केली. त्यामध्ये ड्रिल, शिस्त, सोयी सुविधा, परिसर स्वच्छता, वर्षभर राबवले कार्यक्रम, शिबिर, एनसीसी कार्यालय अशा अनेक बाबींची तपासणी झाल्यानंतर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. भविष्यातील सैनिक भरती, पोलिस भरती व सरकारी नोकरीतील अधिकारी होण्याच्या संधी व देशप्रेम वाढीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यानंतर एमइएस हायस्कूलच्या एनसीसी विभागाची वार्षिक तपासणी करण्यात आली. यावेळी प्राचार्या उमा जोशी यांचा सत्कार स्वीकारून मी व माझी टीमने तपासणी केली असता आपल्या एनसीसी विभागावर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर श्री शिवाजी हायस्कूलची तपासणी करून प्राचार्य शिरसाट यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मेहकर सारख्या ग्रामीण भागात एनसीसीचे उत्कृष्ट कार्य सुरु आहे, अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली. तपासणीनंतर त्यांनी मेहकर परिसरातील शारंगधर बालाजी तसेच जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी प्रा. जोशी, प्राचार्य शिरसाट, प्रा. डॉ. ओम गजभिये, लेफ्टनंट आशिष देशपांडे, लेफ्टनंट डी. एस. धांडे, लेफ्टनंट सुशेन मैंद, प्रा. डॉ. संजय दांदडे, प्रा. डॉ प्रमोद हुंबाड, प्रा. डॉ प्रवीण जोशी, प्रा. डॉ. शाम देशमुख व शिक्षक मगर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.