आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूर- वझर सरकटे बस सेवा सुरू:राष्ट्रवादी नेते नितीन शिंगणे यांच्या प्रयत्न; ग्रामीण भागातील जनतेला दिलासा

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अडीच वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे बंद पडलेली मलकापूर- वझर सरकटे ही बस नुकतीच सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही बस सुरू करण्यासाठी स्काऊट गाईड चे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नितीन शिंगणे यांनी वेळोवेळी राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. कोरोनाच्या संसर्गात लॉकडाऊन लागल्यामुळे एस. टी. महामंडळाचे अतोनात नुकसान झाले. त्यातच एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. त्यामुळे अनेक बस बंद झाल्या. कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने सर्वच ठिकाणचे व्यवहार व बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. मात्र असे असतानाच महामंडळातील कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या काळात संप पुकारल्याने एसटीचे चाके थांबली. काही महिने एसटी कर्मचारी व शासनात हा संघर्ष सुरू राहिला. अखेर शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करून त्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले.

शासनाच्या या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत एसटीचे चाके धावू लागली. मात्र, असे असले तरी पुर्वी प्रमाणे जात असलेल्या अनेक ग्रामीण भागातील बससेवा या अजूनपर्यंत बंदच आहे. त्यातीलच मलकापूर- वझर सरकटे ही बस मागील दोन तीन दिवसापर्यंत बंद होती. ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मलकापूर- वझर सरकटे ही बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती.

दरम्यान, या मागणीची दखल राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन शिंगणे यांनी घेत त्याबाबत एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मलकापूर येथून २९ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता बुलडाणा मार्गे चिखली, मेरा, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड व वझर सरकटे ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...